अमृतसरमधील इस्लामाबाद पोलिस स्टेशनच्या बाहेर मंगळवारी पहाटे 3.15 च्या सुमारास मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर पोलीस कर्मचारी आणि आजूबाजूच्या घरातील लोक तात्काळ बाहेर आले. स्फोटानंतर लगेचच पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याचे दरवाजे बंद करून सतर्कता बाळगली. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.
सकाळी इस्लामाबाद पोलिस स्टेशनच्या बाहेर स्फोटाचा आवाज पोलिस कर्मचाऱ्यांना ऐकू आला. यानंतर पोलिसांनी वरिष्ठांना माहिती दिली आणि सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. तपासादरम्यान कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. स्फोट नक्कीच ऐकू आला, सध्या त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.