महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील भूगाव येथील इवोनिथ स्टील प्लांटच्या भट्टीत भीषण स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटानंतर आगीत सुमारे 15 मजूर होळपले. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींच्या नातेवाईकांनी कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.