पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबग्गा परिसरात स्फोट झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. यावेळी अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी सांगितले की, 4 जण जागीच गंभीर जखमी झाले असून शेजारी राहणारी 2 लहान मुलेही जखमी झाली आहे. सर्व जखमींना उपचारासाठी लखनौ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहे.