आठ वर्षांच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या, भावाला मारण्यासाठी आले होते हल्लेखोर

सोमवार, 2 डिसेंबर 2024 (11:33 IST)
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील सरधना पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात रविवारी संध्याकाळी आठ वर्षांच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरधना पोलिस स्टेशन हद्दीतील कालिंदी गावात संध्याकाळी आठ वर्षांच्या चिमुरडीचा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचली व मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि हल्लेखोरांचा शोध सुरू केला.
ALSO READ: मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार, 8 जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार सरधना पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर यांनी सांगितले की, हल्लेखोर हे मुलीच्या भावाची हत्या करण्यासाठी आले होते. परंतु त्यांनी गोळीबार केल्यानंतर मुलगी अचानक समोर आली ज्यामुळे गोळी थेट छातीत  लागल्याने तिचा मृत्यू झाला. मुलीच्या भाऊ साहिल 25 याचा सुमारे दोन वर्षांपूर्वी गावातील काही लोकांशी काही कारणावरून वाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेत दोन तरुणांची नावे समोर आली असून, त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे एसएचओने सांगितले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती