पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिधा काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती. रविवारी तिने सोसायटीच्या फ्लॅटच्या 29 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला.
मिळालेल्या माहितीनुसार रिधाचे वडील 1995 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहे. त्यांनी यावर्षी जूनमध्ये स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतली होती. त्यांच्या कारकिर्दीत ते उत्तर प्रदेशातील सर्वात लोकप्रिय आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक होते. मायावती सरकारच्या काळात राजा भैया यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात मानसिक तणाव हे आत्महत्येचे कारण मानले जात आहे. पण, रिधाला कशाचा ताण होता हे कळू शकलेले नाही. रिधाचे कुटुंबीय आणि तिच्या जवळच्या लोकांशी बोलल्यानंतर पोलीस या प्रकरणातील इतर पैलूंचाही तपास करत आहे.