नाशिकमध्ये बोकड -बकऱ्या यांची चोरी

शनिवार, 24 डिसेंबर 2022 (08:49 IST)
photo symbolic
घास बाजारात विक्रीसाठी आणलेल्या दोन बोकडांसह दोन बकर्‍या अज्ञात इसमाने कारमध्ये कोंबून चोरुन नेल्याची घटना भद्रकालीत घडली.
 
फिर्यादी साईम मोहम्मद शफी कोकणी (रा. जुने नाशिक) यांनी नेहमीप्रमाणे  घास बाजारातील मौलाबाबा जीमजवळ चॉकलेटी व पांढर्‍या रंगाचे दोन बोकड तसेच दोन बकर्‍या त्यांच्या कपाळावर सफेद रंगाने नक्षी काढलेली असे प्राणी विक्रीस आणले होते . अशी ही चार जनावरे तेथे बांधून ठेवली होती.
 
दरम्यान एम.एच.१४ बी.एक्स. ४८०८ या क्रमांकाच्या होंडा अ‍ॅसेट कारमधून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी दोन बोकड व दोन बकर्‍या असे सुमारे ५० हजार रुपये किंमतीची जनावरे कारमध्ये बळजबरीने कोंबली व चोरुन नेली. ही बाब कोकणी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती