लग्नाच्या वरातीत गोळीबार आणि चाकूने हल्ला केला

रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (14:30 IST)
नागपुरात यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या परिसरात व्हाट्सअप वर ठेवलेल्या स्टेटस वर खराब कॉमेंट्स केल्याने एका तरुणाने रागाच्या भरात येऊन वरातीत दुचाकीवर येऊन हवेत गोळ्या झाडल्या.आणि एकावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केले. या घटनेमुळे सर्वत्र वरातीत गोंधळ उडाला. पोलिसांनी या प्रकरणात 6 जणांना अटक केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार समीर खान यांच्या बाबत आबा पठाण ने केलेल्या मेसेज ला रिजवान नावाच्या मुलाने आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर ठेवले होते.त्यावर फिरोज खान यांचा भाचा अशरफ खान ने चुकीच्या पद्धतीने कॉमेंट केले. त्यावर समीर ने त्याला तू चुकीचे कॉमेंट्स का केले असे विचारल्यावर मी बादशाह आहे काहीही करेन असे सांगितले. समीरला त्याचा फार राग आला . त्यावर समीर ने अशरफला आता तू कुठे आहेस ? असे विचारल्यावर त्याने मी वरातीत आहे असे सांगितले.  
 
फिरोज गफार खान रा.मेहबूबपुरा  यांच्या पुतण्याचे काल रात्री लग्न होते.त्याची वरात काढण्यात आली. वरात खजाना हॉटेल जवळ येतातच वरातीत दुचाकीवर एक तरुण आला आणि त्याने हवेत गोळीबार केला. अचानक झालेल्या या प्रकाराने वरातीत गोंधळ उडाला.समीर खान आणि अल्तमास अन्सारी असे या आरोपीचे नाव आहे. समीर ने वरातीत हवेत गोळ्या झाडल्या आणि फिरोज खान यांच्या भाचा अशरफ खान वर चाकूने हल्ला करत त्याला जखमी केले.नंतर तो पळत जात असताना लोकांनी त्याला पडकून पोलिसांना कळविले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी समीर आणि  अल्तमास याला ताब्यात घेतले. या वेळी पोलिसांनी आरोपी समीर कडून बंदूक आणि फायर केलेले दोन काडतूस जप्त केले आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास करत त्यांच्या चार साथीदारांना अटक केली आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती