पुण्यावरील पाणी संकट अधिक तीव्र होणार

शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (09:46 IST)
पाणी कपातीचा सामना करणार्‍या पुणेकरांवर आता अधिक त्रास होणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार 2017 सालाच्या लोकसंख्येनुसार प्रतिदिन 650 एमएलडी, म्हणजेच सध्याच्या वापरापैकी निम्मेच पाणी मिळणार असल्याने, पुण्यावरील पाणी संकट अधिक तीव्र होणार आहे. आदेशाची प्रत मिळताच जलसंपदाकडून अंमलबजावणी होणार आहे. या आदेशाविरोधात महापालिकेला उच्च न्यायालयातच दाद मागावी लागणार आहे.
 
पुण्यातील लोकसंख्येसाठी ठरवून देण्यात आल्यापेक्षा जादा पाणी वापर होत असल्याने, शेतीसाठी कमी पाणी मिळत असल्याबाबत बारामती येथील शेतकरी विठ्ठल जराड यांनी जलसंपदा विभागात याचिका दाखल केली होती. महापालिकेने 2017 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये शहराची लोकसंख्या 40 लाख 76 हजार असल्याची नोंद होती. प्रतिमाणशी प्रतिदिन 155.25 लिटर पाणी, या निकषानुसार एवढ्या लोकसंख्येला प्रतिदिन 650 एमएलडी पाणी पुरेसे असल्याचा दावा जराड यांनी याचिकेत केला होता. यावर मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांच्यासमोर सुनावणी झाली.  जराड यांची मागणी ग्राह्य धरून महापालिकेने 650 एमएलडी इतकेच पाणी घेण्याचा निकाल मुंडे यांनी दिला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती