यंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान पिफचे आयोजन

बुधवार, 12 डिसेंबर 2018 (09:01 IST)
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही (पिफ) महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीची दखल घेतली आहे. ‘इन सर्च आॅफ ट्रुथ-सेलिब्रिटिंग १५० इयर बर्थ अँनिव्हर्सरी आॅफ महात्मा गांधी’ या संकल्पेनवर यंदाचा महोत्सव  रंगणार आहे. पुणे फिल्म फौंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दि. १० ते १७ जानेवारी दरम्यान पिफचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षीही  विविध देशांकडून  महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, 114 देशांमधून १६३४  चित्रपट प्राप्त झाले आहेत.  त्यातील निवडक १५० हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली आहे. 
 
याशिवाय महोत्सवात जागतिक आणि मराठी स्पर्धात्मक विभाग, माहितीपट,कं ट्री फोकस, आशियाई जागतिक चित्रपट, सिंहावलोकन ( रेस्ट्रोपेक्टिव्ह), भारतीय चित्रपट, आजचा मराठी चित्रपट, विशेष स्क्रिनिंग आणि कँलिडोस्कोप आदी विविध विभागामध्ये दर्जेदार, आशयसंपन्न कलाकृती पाहाण्याची संधी रसिकांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.  या महोत्सवातील चित्रपट पाहाण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची माहिती www.piffindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती