पुणेकरांच्या सेवेत एसी इलेक्ट्रिक बस येणार

पुणेकरांचा प्रवास प्रदुषणमुक्त आणि सुखकर व्हावा यासाठी एसी इलेक्ट्रिक बस लवकरचसेवेत दाखल होणार आहेत. कारण, पीएमपीच्या ताफ्यात पहिल्या २५ बस समाविष्ट होण्याच्या निविदेस गुरुवारी मंजुरी देण्यात आली. पुण्याच्या पेठांमध्येही सहज प्रवास करू शकतील अशा ९ मीटरच्या २५ बस भाडेतत्त्वावर घेण्याचे कंत्राट देण्यात आले असून १२ मीटर लांबीच्या बसची निविदा प्रक्रियाही काहीच दिवसांत पूर्ण होईल, अशी घोषणा पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे. 
 
९ मीटरच्या (३१ सीटर) २५ बस येत्या २६ जानेवारीला पीएमपीएमएलच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. एसी इलेक्ट्रिक बसची सुविधा नागरिकांना नॉन एसी बसच्या दरातच उपलब्ध होणार आहे. या सर्व बस ‘बीआरटी काँप्लायंट’ आहेत. ‘ओलेक्ट्रा ग्रीनटेक’ या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. या बसच्या चार्जिंग तसेच देखभालीची जबाबदारी कंपनीची राहणार आहे, तर पालिका चार्जिंगसाठी वीज पुरवणार आहे. सुरूवातीला या लहान बस बीआरटी मार्गावरच धावणार असून निगडी ते भेकराईनगर या बीआरटी मार्गावर ही बस धावणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती