मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्र्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले. पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण अहवाल मिळाल्यानंतर, पवार यांनी आरोग्य विभागाला जलद, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. पवार यांनी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. चौकशी अहवालातील निष्कर्षांच्या आधारे सरकार या प्रकरणात कारवाई करेल, असे पवार यांनी म्हटले आहे.