मजुरांची नोंदणी करण्याची राज यांची सूचना राज्य शासन प्रत्यक्षात उतरवणार

शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (16:05 IST)
लॉकडाऊनमध्ये परराज्यात गेलेले स्थलांतरित मजूर परतल्यावर त्यांची नोंद करा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी केली होती. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर अनेक मजूर परतले पण त्यांची नोंद झाली नाही. दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर मजूर पुन्हा एकदा आपल्या गावी गेलेयत. दरम्यान या मजुरांची नोंद ठेवावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी झालेल्या बैठकीत दिलेयत.  
 
मजुरांची नोंदणी करण्याची राज ठाकरे यांची सूचना राज्य शासन प्रत्यक्षात उतरवणार आहे. गेल्यावर्षी राज ठाकरे यांनी ही सूचना केली होती, मात्र त्याकडे राजकारण म्हणून पाहिलं गेलं. आता कोरोना वाढल्यावर सरकारला हे पुन्हा सुचलं हे चांगलं आहे, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटलंय. 
 
सध्या अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. पुढे  संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल. मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून आणि ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती