इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी- मार्च मध्ये होणार असून प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापनचे गुण भरण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण मंडळाच्या संकेतस्थळावर प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड या दुव्याद्वारे लॉग इनचा वापर करून शाळा, कनिष्ठ महविष्यालय ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करणार.
नियमित कालावधीमध्ये गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक आऊट ऑफ टर्न परीक्षेसाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालये, शाळांना उपलब्ध करून देणार तसेच या विद्यार्थ्यांचे गुण देखील ऑनलाईन पद्धतीने नोंदवावे लागणार. अधिक माहितीसाठी http://www.mahahssboard.in या संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्यावी.