नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात महत्वाचे बदल!
शुक्रवार, 12 जानेवारी 2024 (09:22 IST)
नाशिक :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी (ता.१२) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांशी मार्गांवरील वाहतूक वळविण्यात आलेली आहे.
तर, सभास्थळी येणार्याठिकाणी ठिकठिकाणी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे, काही मार्ग हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली असून, त्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविल्यासंदर्भातील अधिसूचना शहर पोलीस वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे.
वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग:
संतोष टी पॉईंट ते स्वामी नारायण चौकीकडे जाणारा मार्ग, तपोवन चौफुली ते कार्यक्रमस्थळाकडे जाणारा मार्ग, स्वामी नारायण चौक ते कार्यक्रमस्थळाकडे जाणारा मार्ग, काट्या मारुती चौक ते संतोष टी पॉईंटकडे जाणारा मार्ग, अमृतधाम चौफुली ते मिरची सिग्नलकडे जाणारा मार्ग, जनार्दन स्वामी मठ टी पॉईंट ते तपोवनकडे जाणारा मार्ग, लक्ष्मी नारायण मंदिर ते तपोवनकडे जाणारा मार्ग, निलगिरी बाग पाट चौफुली ते तपोवनकडे जाणारा मार्ग, बिडी कामगार पाट चौफुली ते निलगिरी बागकडे जाणारा मार्ग, नांदूरनाका ते तपोवनकडे जाणारा मार्ग, रासबिहारी ते निलगिरी बागकडे जाणारा मार्ग, तारवाला चौक ते अमृतधामकडे जाणारा मार्ग, दिंडोरी नाका ते काट्या मारुती चौकाकडे जाणारा मार्ग, टाकळी गाव, काठे चौकाकडून सिदधीविनायक चौक, अमृतधामकडे जाणारा मार्ग, सितागुंफा मंदिर ते काळाराम मंदिराकडे जाणारा मार्ग, काळाराम मंदिर ते नाग चौक, काट्या मारुती चौकीकडे जाणारा मार्ग, सरदार चौक ते काळाराम मंदिरकडे जाणारा-येणारा मार्ग, मालेगाव स्टॅण्ड ते रामकुंड, गाडगे महाराज पुलापर्यंत जाणारा-येणारा मार्ग.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग:
द्वारका उड्डाणपुलावरून जा-ये करता येणार
अमृतधाम, रासबिहारी मार्गे जा-ये
नांदूरनाका ते तपोवनकडे जाणारी अवजड वाहतूक बिटको, नाशिकरोड, जेलरोड, जत्रा चौफुलीमार्गे
मुंबई, इगतपुरी, घोटी, वाडिवर्हे, त्र्यंबक, जव्हार, अंबड, सिडको, भद्रकालीकडून सभेसाठी येणारी वाहने मुंबई आग्रा रोडने जुना मुंबई नाका, द्वारका सर्कल, ट्रॅक्टर हाऊसकडून घंडागाडी डेपोजवळ पार्किंग
पुणे महामार्गाने येणारी वाहने नाशिकरोड रेल्वेपुलावरून खाली उतरून बिटको सिग्नलवरून जेलरोडकडे वळतील. औरंगाबाद रोडवरील रुद्रा फार्म मैदान, गीताई लॉन्स, शहाणे फार्म याठिकाणी वाहन पार्किंग