हा अपघात काल रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घडला कार दुभाजकाला धडकली .मात्र कारमधील सर्व जण बचावले. नंतर कार दुभाजकावरून काढत असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले. या मध्ये सहा जणांचा मृत्यू झाला.हे सर्व गेवराईचे रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरगढी पुलाजवळ एसयूव्ही दुभाजकावर धडकली. वाहनातील सर्व जण बचावले आणि गाडी दुभाजकावरून काढण्यासाठी खाली उतरले. आणि वाहन बाजू करू लागले.
मात्र या वेळीच काळाने झडप घातली आणि रात्री 11:30 वाजेच्या सुमारास भरधाव येणाऱ्या ट्रक ने सहाही जणांना चिरडले. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅकने सहाही ज्यांना दूरवर फेकले त्यांचे मृतदेह रस्त्यावर विखुरलेले होते. अपघातांनंतर ट्रक चालक पसार झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकाचा शोध घेत आहे.