महायुती सरकारच्या काळात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यातून ताजी घटना समोर आली आहे. येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गुन्हेगारांच्या छळाला आणि धमक्यांना कंटाळून मृत्यूला कवटाळले.