महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात रविवारी दुपारी एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान जोरदार वाऱ्यामुळे मंडप कोसळल्याने पंचवीस भाविक जखमी झाले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 13 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 12 जणांना हसनाबाद येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
भोकरदन तहसीलमधील वझीरखेडा गावात दुपारी 1 वाजता ही घटना घडली, जेव्हा संतोष महाराज अधवणे यांचे 'शिव महापुराण'वरील प्रवचन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. अधिकाऱ्याने सांगितले की, लोखंडी सळईच्या मदतीने बांधलेला तात्पुरता मंडप जोरदार वाऱ्यामुळे कोसळला. त्याचे छत खाली जमलेल्या भाविकांवर पडले.
महारुद्र यज्ञानिमित्त वजरखेडा गावात आयोजित शिव महापुराण कथेदरम्यान अनेक लोक जखमी झाले. जखमींना जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.16 जणांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यापैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नाही.हे प्रवचन 18एप्रिल रोजी सुरू झाले आणि 25 एप्रिलपर्यंत सुरू राहील आणि आज दुपारी 5000 भाविक जमले होते.