धक्कादायक ! अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केली

सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (13:03 IST)
अवघे 15 आणि 17 वर्षांची ही मुलं असे टोकाचे पाऊल घेऊ शकतात. अशी कोणीही कल्पना केली नसणार. नववीत आणि अकरावीत शिकणाऱ्या या अल्पवयीन प्रेमी युगुलांनी एकमेकांच्या हाताला दोरी बांधून गडचिरोलीतील एका पुलावरून वैनगंगेच्या नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली.यांचे मृतदेह आरमोरी तालुक्यातील शिवणी घाटावर आढळले. मुलाचे वय वर्षे 17 आणि मुलीचे वय वर्ष 15 आहे.हे दोघे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात चिंचोली बुजुर्ग येथील रहिवासी होते.
 
हे दोघे 3 ऑगस्ट पासून बेपत्ता होते.त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला.ते दोघे असं काही करतील याची कोणालाही कल्पना नव्हती.शोधल्यावर देखील त्यांच्या शोध न लागल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांना कळवले.ते दोघे गडचिरोली जातील असे कोणालाच वाटले नव्हते.
 
ब्रह्मपुरी पोलिसानी गडचिरोली पोलिसांना ते दोघे बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती.त्यांनी देखील दोघांचा तपास लावण्यास सुरुवात केली असताना त्यांना दोन मृतदेह शिवणी घाटावर आढळल्याची माहिती मिळाली पोलिसांनी चौकशी केल्यावर त्या अल्पवयीन प्रेमी युगुलांचे मृतदेह होते. एकमेकांच्या हाताला दोरी बांधलेली होती. प्रेमप्रकरणातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
 
या घटनेची माहिती मिळतातच दोघांचे कुटुंब हादरून गेले.आणि त्यांनी हंबरडा फोडला.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती