मिळालेल्या माहितीनुसार पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "काही लोक संस्कृती आणि मराठी भाषा स्वीकारण्यास नकार देतात. जर महाराष्ट्रात नसेल तर मराठी भाषा कुठे असेल. पाकिस्तान, बांगलादेश किंवा नेपाळमध्ये? जर लोक भाषेसाठी आंदोलन करत असतील तर आशिष शेलार त्यांची तुलना पहलगाम दहशतवाद्यांशी करतात. हे चुकीचे आहे आणि भाजपची मानसिकता प्रतिबिंबित करते." असे देखील राऊत यावेळी म्हणाले.