पुण्यातील रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव सुरज शुक्ला असून त्याने हातात कोयता घेऊन पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला.या घटनेनंतर, काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुतळ्याला दुग्धअभिषेक करून निषेध व्यक्त केला. पुतळा तोडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सुरज शुक्लाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर पोलीस त्याची चौकशी करत आहे.
या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला पोलिस ठाण्यात नेले. पोलिस अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.
यातून समाजात केवळ तेढ निर्माण करणे हाच उद्देश आहे. पण हा उद्देश देशातील जनता कधीही पूर्ण होऊ देणार नाही. पुणे स्टेशन नामांतराची चर्चा थांबत नाही तोवर काल रात्री भगवे वस्त्र परिधान करून सुरज शुक्ला या तरुणाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली.आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी अरविंद शिंदे यांनी केली आहे.