यामुळे त्यावेळी शुल्क न भरल्याने प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज निश्चित करण्याची संधी मिळाली आहे. तसेच वाढीव मुदतीमध्ये अर्ज भरणार्या विद्यार्थ्यांना 2 मेपर्यंत शुल्क भरण्यासाठी मुभा दिली आहे. दरम्यान, 30 एप्रिलनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज किंवा 2 मेनंतर शुल्क भरता येणार नाही. अर्ज नोंदणीसंदर्भात राज्य परीक्षा परिषदेकडून www.mscepune.in आणि
https://www.mscepuppss.in या संकेतस्थळांवर सविस्तर माहिती उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.