औरंगजेबानेही छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान केला नाही म्हणत संजय राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनामाची मागणी

मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (16:45 IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे किल्ल्यात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला.या प्रकरणाचे पडसाद सध्या राज्यात पडत आहे. विरोधक यावर शिंदे सरकारवर टीका करत आहे.

या वर प्रतिक्रिया देत शिवसेनेचे युबीटीचे नेते संजय राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात कथित घोटाळा झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच औरंगजेब आणि मुघलांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान केला नव्हता असे ते म्हणाले.  

या प्रकरणी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले, गेल्या वर्षी नौदल दिना निमित्त 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात राजकोटच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण पंत प्रधानांच्या हस्ते राजकीय हेतूने केले.

सोमवारी हा पुतळा कोसळला. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, या साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे जबाबदार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा.अशी मागणी त्यांनी केली.
Edited by - Priya Dixit   
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती