एका 25वर्षीय फॅशन मर्चेंडाइझिंग विद्यार्थिनीला मुंबई विमानतळावर सिंगापूरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये चढण्यापासून थांबवण्यात आले. तिच्या पासपोर्टमधून चार पाने गायब असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. तसेच ही विद्यार्थिनी, वरळी येथील तिच्या संस्थेने प्रायोजित केलेल्या टुरिस्ट व्हिसावर इंटर्नशिपसाठी सिंगापूरला जात होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विदयार्थिनीने थायलंडचा आपला पूर्वीचा प्रवास लपवण्यासाठी पासपोर्टची पाने फाडली होती. 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान ती थायलंडला गेली होती. तसेच संस्थेपासून हे लपवण्यासाठी तीने आजारपणाच्या बहाण्याने परीक्षेला सुट्टी घेतली होती. आता या विद्यार्थिनी विरुद्ध फसवणूक आणि पासपोर्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे व पुढील चौकशी सुरु आहे.