अधिकृत माहितीनुसार नाशिक तालुक्यातील लहवितचे भुमीपूत्र व तोफखाना केंद्राच्या 285मिडियम रेजिमेंटचे लान्सनायक संतोष विश्वनाथ गायकवाड शहिद झाले आहेत. शहीद जवान संतोष गायकवाड हे सिक्कीमच्या उत्तरेला आसाम राज्यातील होजाई जिल्ह्यातील लंका शहराजवळ बर्फाळ प्रदेशात कर्तव्यावर असताना रक्त गोठविणाऱ्या थंडीमुळे त्यांना अचानकपणे मेंदूमध्ये त्रास झाला यावेळी रेजिमेंटकडून तत्काळ त्यांना कोलकत्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, परंतु दुर्दैवाने आज पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली शहीद संतोष गायकवाड यांच्या पश्चात आई-वडील पत्नी तीन मुली मुलगा दोन भाऊ असा परिवार आहे.