लग्नाचं आमिष दाखवून केले अत्याचार; वर्ध्यात पोलीस निरीक्षकार गुन्हा दाखल
पोलिसांनी याप्रकरणी अमर उर्फ लखन शांताराम बारोट व पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे यासह त्यांचा साक्षीदार निखिल राजेश सोनवणे या तीन जणांना अटक केली आहे. मृत मुकेश राजपूत हा चायनीजच्या गाडीवर काम करत होता सोमवारी काम आटोपून नेहमीप्रमाणे तो घरी निघून गेला होता. त्यानंतर मुकेशचे मित्र अमर उर्फ लखन बारोट व पराग उर्फ बबलू आरखे या दोघांनी मुकेशला पार्टी करायची सांगत गोलानी मार्केटमध्ये बोलावलं. त्यानंतर ते त्याला तिसऱ्या मजल्यावर घेऊन गेले.
मित्र इथे बसून दारू पीत असताना अमर व पराग या दोघांनी मुकेश सोबत वाद घातला. या वादातून दोन्ही मित्रांनी मुकेशला तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत त्याची हत्या केली. घटनेनंतर अमर उर्फ लखन व पराग उर्फ बबलू हे दोघे पोलीस स्टेशनला जाऊन मुकेश वरून पडल्याची बतावणी करत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करत परिसरातील सीसीटीव्ही ची पाहणी केली असता मुकेशला वरून ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावरून पोलिसांनी अमर उर्फ लखन शांताराम बारोट व पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे या दोघांना अटक केली असून त्यांचा सहकारी निखिल राजेश सोनवणे यास देखील पोलिसांनी अटक केली आहे.