मुंबईतल्या रिक्षावाल्यांची तक्रार घेऊन महिला थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचल्यायेत. या महिलांचा आक्षेप आहे तो रिक्षातल्या आरशावर बहुतेक पुरूष रिक्षाचालक ड्रायव्हरसमोर लावलेल्या रिअरव्ह्यू मिररचा वापर प्रवासी महिलेकडे एकटक बघण्यासाठी करतात असा या महिलांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होतं आणि अपघात होतात.
रिक्षातील असे आरसे काढून टाकावेत अशी मागणी महिलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेनं केलीय. रिक्षाच्या आत जो आरसा बसवण्यात आला आहे. त्याचा काही उपयोग नसतो. कारण रिक्षा पाठिमागून संपूर्ण बंद असते. या आरशाचा उपयोग फक्त पाठिमागे बसलेल्या महिलांना किंवा मुलींना बघण्यासाठी केला जातो, असा आरोप या स्वंयसेवी संस्थेने केला आहे.