वायफाय पासवर्ड न दिल्याने 17 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (20:35 IST)
नवी मुंबईतील कामोठेयेथे हाऊसिंग सोसायटीत काम करण्याऱ्या दोघांनी एका 17 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केला. खुनाचे कारण धक्कादायक होते. वायफायचे पासवर्ड न दिल्यामुळे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. विशाल मौर्य (17)असे या मृत तरुणाचे नाव असे. कामोठे परिसरातील सेक्टर -14 येथे विशाल एका बेकरी मध्ये काम करायचा शुक्रवारी तो काम आटपून घरी येत असताना नेहमीच्या पानटपरीवर पण खाण्यासाठी गेला. तर विशालला  रवींद्र आणि राज हे भेटले त्यांनी विशाल कडून मोबाईलचा डेटा संपला आहे आम्हाला हॉटस्पॉट दे आणि वायफायचे पासवर्ड सांग असे म्हटले. विशालने पासवर्ड देण्यास नकार दिला त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. नंतर राज आणि रवींद्र यांनी विशालला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरु केले. पानटपरी वाल्याने मध्यस्थी करत त्यांचे वाद मिटविण्याचा प्रयत्न केला पण आरोपींनी चाकू काढून विशालचा पाठीत भोकला आणि तेथून पळाले.विशाल या हल्ल्यात गंभीर जखमी झाला त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 
कामोठे पोलिसांनी विशालचे खून करणाऱ्या रवींद्र हरियानी(22)आणि राज वाल्मिकी(19) आरोपीना अटक केली आहे. नवी मुंबई झोन -1 चे डीसीपी विवेक पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायफायचा पासवर्ड न दिल्याने विशालचे  रवींद्र आणि राज याच्याशी वाद झाले वादातून रागाच्या भरात आरोपींची विशालचे चाकू भोकून निर्घृण हत्या करण्यात आली. खुनाच्या आरोपाच्या खाली रवींद्र आणि राज दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून त्यांना 2 नोव्हेंबर पर्यंत ठेवण्यात येईल.  
 
Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती