ऊर्जा विभागात भरती सुरु होणार, परिपत्रक जारी

बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (21:59 IST)
राज्यातल्या ऊर्जा विभागातील भरती प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना आता ईडब्ल्यूएस प्रवर्गातून भरती प्रक्रियेतून सहभाग घेता येईल. ऊर्जा विभागाने या संदर्भात परिपत्रक काढून माहिती दिली आहे. 
 
यापूर्वी, एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना  सोडून ही भरती होणार होती,  पण या निर्णयाला मराठा समाजाकडून कडाडून विरोध झाल्यानंतर निर्णय बदलण्यात आला. त्यामुळे एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना इडब्ल्यूएस प्रवर्गातून भरतीसाठी सहभागी होता येईल. यापूर्वी ऊर्जा विभागातील तीन जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. 
 
मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम निर्णय आल्यानंतर एसईबीसी जागांची भरती केली जाईल, असे महावितरणने म्हटले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती