राज्यात कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर आले असून आकडेवारीनुसार नंदुरबार, सातारा, अमरावती, नागपूर, नाशिक ही पाच ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. तर विदर्भात कोरोनाचा धोका सर्वाधिक वाढला आहे. तर अकोला, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.
4 जानेवारीला राज्यात 48,801 सक्रिय रुग्ण होते तर 3 फेब्रुवारीला 37,516 रुग्ण होते. म्हणजेच महिनाभरात ही संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. पुणे, ठाण्यासह 21 जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचं प्रमाण घटलं आहे. पण इतर 14 जिल्ह्यात हे प्रमाण वाढलं आहे. यात सांगली, कोल्हापूर, जळगाव, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे.