सायंकाळी पाच च्या सुमारास एका बसला अचानक आग लागली. ही आग लागल्याचे समजाताच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी धावत गेले. या कर्मचार्यांनी अग्निशामक दल आणि हॉटेलमधील कर्मचार्यांना माहिती देवून पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग इतकी भीषण होती की, काही क्षणातच शेजारी-शेजारी उभ्या असलेल्या पाच ही बसेसनी पेट घेतला. त्यामुळे बसस्थानकात प्रचंड खळबळ उडाली.