Weather : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला असून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली असून नागपुरात हाहाकार माजवला आहे. राज्यातील काही भागात मध्यम ते मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. हवामान खात्यानं 25 सप्टेंबर पर्यंत यलो अलर्ट दिला आहे. शुक्रवारी कोकण, विदर्भ , मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस येत आहे. राज्यातील ठाणे, मुंबई, पालघर, धुळे, नंदुरबार, रत्नागिरी, रायगड, नाशिक, अकोला, नगर, पुणे, चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, नागपूर यवतमाळ आणि नाशिकात यलो अलर्ट सांगण्यात आला आहे.
अंबाझरी, गोरेवाडा हे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने जवळच्या भागातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. शहरातील नाग नदी आणि पिवळी नदी दुथडी भरून वाहत आहेत.शहरांच्या अनेक भागात गाड्या वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.