आरसीबी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सामना करत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यापूर्वी कोहलीने टी-20 मध्ये 12983 धावा केल्या होत्या, परंतु मुंबईविरुद्ध 17 धावा पूर्ण करताच तो 13000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला. कोहलीपूर्वी फक्त ख्रिस गेल, अॅलेक्स हेल्स, शोएब मलिक आणि किरॉन पोलार्ड यांनीच टी-20 मध्ये 13000 धावा पूर्ण केल्या आहेत.
कोहली हा सर्वात जलद असा विक्रम करणारा दुसरा फलंदाज आहे. कोहलीने त्याच्या ३८६ व्या टी-२० डावात 13000 धावा पूर्ण केल्या. त्याच्या पुढे वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल आहे, ज्याने 381डावांमध्ये हा विक्रम केला. या बाबतीत कोहलीने इंग्लंडचा फलंदाज अॅलेक्स हेल्सला मागे टाकले. कोहलीने हेल्सपेक्षा 90 कमी डावांमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या.