शनिवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचलेल्या दिल्लीने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सहा गडी गमावून १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, सीएसकेला २० षटकांत पाच गडी गमावून फक्त 158 धावा करता आल्या. सीएसकेचा हा सलग तिसरा पराभव आहे. याआधी, त्यांना राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीविरुद्धही पराभव पत्करावा लागला होता. चेन्नईविरुद्धच्या विजयासह, दिल्ली संघ सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे, तर सीएसके संघ चार सामन्यांत एक विजय आणि तीन पराभवांसह दोन गुणांसह आठव्या स्थानावर आहे.