तसेच लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने होते. प्रथम फलंदाजी करताना एलएसजीने पंजाबला १७२ धावांचे लक्ष्य दिले आहे. लखनौने २० षटकांत ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. लखनौकडून निकोलस पूरन आणि आयुष बडोनी यांनी चांगली फलंदाजी केली. प्रत्युत्तरात, पंजाब किंग्जने हे लक्ष्य १६.२ षटकांत ८ विकेट्स गमावून पूर्ण केले. या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. निकोलस पूरन आणि आयुष बदोनी यांनी एलएसजीला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. तसेच नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौ संघाची सुरुवात खराब झाली.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाब किंग्जने सुरुवातीपासूनच चांगल्या लयीत खेळ केला. सलामीवीर प्रियांश आर्य तिसऱ्या षटकात बाद झाला, पण त्याचा परिणाम पंजाबच्या फलंदाजीवर कधीच दिसून आला नाही. सुरुवातीची विकेट गमावल्यानंतर, प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांनी ८४ धावांची भागीदारी रचली. दोघांच्याही फलंदाजीमुळे हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला.