MI vs KKR: मुंबई संघ पराभवाची मालिका थांबवण्यासाठी तिसऱ्या सामन्यात कोलकाता विरुद्ध खेळेल

सोमवार, 31 मार्च 2025 (13:13 IST)
इंडियन प्रीमियर लीगच्या 2025 च्या हंगामात आतापर्यंत 11 सामने खेळले गेले आहेत. आता या लीगमधील उत्साह हळूहळू वाढत आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स संघ या हंगामातील पहिला आयपीएल सामना त्यांच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर खेळण्यासाठी सज्ज आहे. मुंबई संघ 31 मार्च रोजी त्यांच्या तिसऱ्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध खेळेल. 
ALSO READ: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना 31 मार्च 2025 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाणार. नाणेफेक सामन्याच्या अर्धातासापूर्वी 7वाजता होणार.
 
आतापर्यंत दोन्ही संघांनी हंगामात प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये दोघांची कामगिरी वेगळी राहिली आहे. मुंबईने दोन्ही सामने गमावले आहेत. तर कोलकाताने हंगामाची सुरुवात आरसीबीविरुद्ध पराभवाने केली होती. यानंतर, त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय नोंदवला.
ALSO READ: विराट कोहलीने शिखर धवनचा विक्रम मोडला
आयपीएलमध्ये आतापर्यंत केकेआर आणि मुंबई यांच्यात 34 सामने झाले आहेत, त्यापैकी पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईने 23 वेळा विजय मिळवला आहे, तर कोलकाता संघाने फक्त 11 सामने जिंकले आहेत.
 
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, रायन रिकलटन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, विल जॅक्स, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, विघ्नेश पुथुर. 
 
केकेआर: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
Edited By - Priya Dixit
ALSO READ: आशुतोषने सामनावीराचा पुरस्कार या भारतीय दिग्गजाला समर्पित केला

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती