खरंतर, सध्या बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा परिसरावर तयार झालेलं हवेच्या कमी दाब क्षेत्र बिहारकडे सरकलं आहे. तर उत्तर प्रदेश आणि आसपासच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे उत्तर भारतातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.