देशभरात विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, लखीमपूर जिल्ह्यात अतिरिक्त फौज तैनात

सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (10:38 IST)
नवी दिल्ली. कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी आज लखीमपूर घटनेचा निषेध करून रेल रोको आंदोलन करणार. लखीमपूर खेरी येथील गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करत शेतकऱ्यांनी या रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती. देशभरात विविध ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत रेल रोको आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी मागच्या वेळी भारत बंदची हाक दिली होती, तेव्हा पंजाब, हरियाणा, बिहारसह अनेक ठिकाणी गाड्या थांबवण्यात आल्या होत्या आणि महामार्ग रोखण्यात आले होते. संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे की बंद दरम्यान अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवा कोणत्याही प्रकारे व्यत्यय आणल्या जाणार नाहीत. 
 
शेतकऱ्यांच्या रेल रोको आंदोलनाबाबत पोलिसांचा इशारा. राजधानी लखनौमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. 44 कंपनी पीएसी, 4 कंपनी निमलष्करी दल जिल्ह्यात तैनात. वरिष्ठ IPS अधिकारी 14 संवेदनशील जिल्ह्यांमध्ये तैनात. लखीमपूर जिल्ह्यात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पश्चिम यूपीच्या प्रत्येक जिल्ह्यात एक अतिरिक्त अधिकारी तैनात करण्यात आले आहे. आंदोलन कर्त्यांनी काही गोंधळ केल्यास  रासुका अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती