सध्या तरुण पिढीमध्ये काही वेगळे करून त्याचे चित्र किव्हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा नाद लागला आहे. हे तरुण आपल्या जीवाची काळजी न घेता चित्तथरारक गोष्टी करतात.या मुळे त्यांना आपला जीव देखील गमवावा लागतो.तरीही तरुण असे स्टंट करतात.पण असे स्टंट करताना त्यांचा मागे त्यांच्या कुटुंबियांचे काय होणार ह्याचा विचार सुद्धा करत नाही.अशीच एक घटना घडली आहे पश्चिम बंगालच्या हुगळी मध्ये इथे तिघे मित्र रेल्वेच्या रुळावर सोशल मीडियावर व्हिडीओ टाकण्यासाठी लाईव्ह व्हिडीओ बनवत होते. त्याच वेळी असे काही घडले ज्याची त्यांनी कल्पनाच केली नसणार.
प्रकरण असे आहे की,दुर्गापूजेच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते.हे तिघे मित्र या उत्सवाचे चित्र सोशल मीडियावर टाकण्यासाठी लाईव्ह चित्रित करत होते.धीरज पाटील(14), दिपू मंडल(18), आकाश पांडे(19) या तिघांची नावे आहेत.हे तिघे रेल्वे च्या रुळावरून व्हिडीओ चित्रीकरणात एवढे गुंग होते की त्यांना रेल्वेच्या हॉर्न चा आवाज देखील आला नाही. आणि रेल्वेची धडक लागून किशोर पाटील(14) चा जागीच मृत्यू झाला.परंतु इतर दोघे मित्र थोडक्यातच बचावले.अपघाताची माहिती मिळतातच जीआरपी पोलिसांनी गोपाळ गांगुली यांच्या सह घटनास्थळी पोहोचले आणि किशोरचे मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे.