लग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

शुक्रवार, 27 मे 2022 (13:52 IST)
निपाणीत मुलीच्या लग्नाला जाताना लग्नस्थानापासून अर्धा किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात उतारावरील हॉटेल अमर समोर धोकादायक वळणावर झाला. या अपघातात कंटेनरची धडक कारशी झाली.
या अपघातात नवरीच्या भावासह चुलते, चुलती आणि आजीचा मृत्यू झाला.

छाया आंदगोडा पाटील(55), महेश देवगोंडा पाटील(23), आंदगोडा बाबू पाटील(55),चंपाताई मगदूम(80) अशी मयतांची नाव आहे. 

हे सर्व जण स्तवननिधी मंगल कार्यात लग्नासाठी जात असताना काळाने घाला घातला आणि कंटेनरची धडक कारशी झाली. हा अपघात एवढा जोरदार होता की कार मध्ये मृतदेह अडकून पडले होते. वाहनाचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून कार मध्ये अडकलेले मृतदेह काढण्यात आले आहे. पोलिसांनी अग्निशमनदलाच्या साहाय्याने मदतकार्य सुरु केले आहे. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती