Nandurbar Accident : नंदुरबार मध्ये प्रवाशी बस पालटून भीषण अपघातात, दोघांचा मृत्यू

रविवार, 11 सप्टेंबर 2022 (10:31 IST)
नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात प्रवाशांनी भरलेली एका खासगी लग्झरी बस पालटून झालेल्या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या बस मध्ये एकूण 30 प्रवाशी होते. ही बस महाराष्ट्रातून गुजरातकडे निघाली होती. या बस मधील प्रवाशी मजूर असून कामाच्या शोधात महाराष्ट्रातून गुजरातच्या जुनागड मध्ये जात असल्याचे सांगितले जात आहे.  सध्या या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असून बचावकार्यात अडचणी येत आहे. 

बस चालकाचे नियंत्रण वाहनावरून सुटल्याने हा अपघात झाला असून 30 प्रवाशांना घेऊन जाणारी बस पालटी होऊन बस चालक बस खाली अडकून त्याचा आणि एका दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला तर 3 प्रवाशांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळतातच पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि नागरिकांचा मदतीने अपघातात जखमी झालेल्यांना बस खालून काढण्यात आले. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती