मनसेकडून ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेही सहभागी

शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (21:16 IST)
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मुंबईतील चौपाटीवर भाविकांनी गणरायाचे विसर्जन करण्यासाठी गर्दी केली होती.परंतु, ओहोटीमुळे गणेश मूर्ती समुद्रकिनाऱ्यावर येऊन पडलेल्या आढळल्या.मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी १० सप्टेंबरला मनसेकडून ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेही सहभागी झाले होते. अमित ठाकरेंनी दादर समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून किनारा स्वच्छ केला.या मोहिमेत मनसेच्या कार्यकर्त्यांसह अनेक पर्यावरणप्रेमी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीही सहभागी झाले होते.या मोहिमेअंतर्गत किनाऱ्यावर आलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य गोळा करून ते स्थानिक प्रशासनाकडे सोपविण्यात आले.
मुंबईसह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवरही मनसेकडून ही मोहीम राबविण्यात आली. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती