‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमात ३ हजाराहून अधिक मूर्ती संकलित

शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (20:38 IST)
नाशिक देव द्या, देवपण घ्या या उपक्रमात यंदा सुमारे ३ हजार पेक्षा जास्त मुर्ती व निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. उपक्रमाचे यंदाचे १२वे वर्ष होते. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे सकाळी ९ वाजेपासून “देव द्या देवपण घ्या” या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित होते. गणेशभक्तांना आरती करण्याची व्यवस्था देखील यावेळी उपलब्ध करुन देण्यात आली होती. या उपक्रमास लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे सहकार्य लाभले.
 
नाशिकच्या गोदाप्रेमी भाविकांनी या आवाहनाला भरभरून पाठिंबा दिला. दिड, पाच व सात दिवसांच्या घरगुती गणेशोत्सवातील मूर्ती देखील स्वीकारण्यात आल्या होत्या. विसर्जनाच्या दिवशी सकाळी ९ वाजेपासूनच या उपक्रमाचे कार्यकर्ते चोपडा लाँन्सजवळील गोदापार्कच्या प्रवेशद्वाराजवळ खास तयार करण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करीत होते. निळ्या रंगाचे टि-शर्ट व हातमोजे घातलेले हे कार्यकर्ते नाशिककरांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी लहानग्यांपासून ते वयोवृद्ध नागरिक मोठया संख्येने गणेश मूर्ती दान करत होते. या मुर्तींची पुजा व आरती करुन अत्यंत भावपूर्ण वातावरणात महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येत होत्या.
 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पगार, प्रकाश चितोडकर, विशाल गांगुर्डे, वैष्णवी जोशी, राहुल मकवाना, रोहिणी सोनवणे, मोनाली गवे, जयंत सोनवणे, संकेत निमसे, जयश्री नंदवानी, तुषार गायकवाड, सोनिया पगार, भाग्यश्री जाधव, रोहित कळमकर, कोमल कुरकुरे, भावेश पवार, शुभम पगार, दुर्गा गुप्ता, अतुल वारुंगसे, गौरी घाटोळ, हर्षिता माळी, प्रणाली शिंदे, सोनू जाधव, स्मिता शिंदे, कनिष्का माळी, ललित पिंगळे, अविनाश बरबडे, अमोल पाटील, मयूर पवार, वैभव बारहाते, सागर दरेकर, सिद्धेश दराडे, महेश मंडाले, कुणाल सानप, प्रसाद हिरे, मदन म्हैसधुणे, योगेश निमसे, हरी चौधरी, निलेश मोरे, देवा गायकवाड, भगवान भोगे, सागर बच्छाव, अमोल शेळखे, अमोल गायकवाड, चेतन गांगोडे, विशाल वानखेडे, बंटी भोळे, गोरख महाले, तुषार इप्पर, रोहन जाधव, दर्शन पवार, धनराज रौंदळ, मयुर सावंत, प्रथमेश देवरे, दत्तु जगताप, नितीन पाटणकर आदींनी परिश्रम घेतले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती