Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा नियुक्ती

शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (23:39 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी अधिवेशन दिल्लीतील ताल कटोरा स्टेडियम येथे पार पडले. या अधिवेशनात शरद पवार यांची पुन्हा निवड झाली. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करून दिली. 
 त्यांनी ट्विट केले की आज येथील विस्तारित राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत आदरणीय पवार साहेब यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीयअध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात या देशामध्ये पुरोगामी, धर्मनिरपेक्ष  सर्वसमावेशक विचारांचा प्रसार करू व भारतीय लोकशाही बळकट करू.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती