मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मृत एल देवनाथन उर्फ एनआर लक्ष्मीनरसिंघम हे सहायक व्यवस्थापक होते. 41 वर्षीय देवनाथन हे हरियाणातील फरिदाबादचा रहिवासी होते. ते हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज, मिहान येथे सहाय्यक व्यवस्थापक म्हणून 10 महिने कार्यरत होते. नागपूरच्या मनीषानगर येथील अग्निरथ कॉम्प्लेक्समध्ये ते राहत होते.
तर गौरव भीमसेन चंदेल (वय 32) आणि पवन अनिल गुप्ता (वय 28) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही एकाच कंपनीत काम करत असून ते मूळचे मध्य प्रदेशचे रहिवासी होते. आरोपी पवन देवनाथन यांचा रूम पार्टनरही होता. कामात चुका झाल्या की देवनाथन सिनियर असल्याने त्यांना शिव्या द्यायचा आणि रागवायचा. या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने ही हत्या केली.
आरोपी गौरव आणि पवन अनेकदा बॉस देवनाथनसोबत त्यांच्या खोलीत पार्टी करायला जात होते. सोमवारी मध्यरात्रीही तिघेही एकत्र बसून दारू पीत होते. त्यानंतर देवनाथन यांनी दोघांनाही सांगितले की, आता कामात चुका झाल्या तर सहन करणार नाही आणि नोकरीवरून काढून टाकेन. देवनाथनांच्या या धमकीने गौरव आणि पवन संतापले.