मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील शिकागो शहरातील एका रेस्टॉरंटबाहेर बुधवारी रात्री झालेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १४ जण जखमी झाले आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितले की गोळीबारात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गोळीबाराची ही घटना बुधवारी रात्री उशिरा शिकागोच्या रिव्हर नॉर्थ भागात घडली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना एका रेस्टॉरंटबाहेर घडली, जिथे एका गायकाची अल्बम रिलीज पार्टी आयोजित करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की कोणीतरी रेस्टॉरंटबाहेर उभ्या असलेल्या गर्दीवर गोळीबार केला आणि लगेचच वाहनातून पळून गेला. पोलिसांनी सांगितले की सध्या कोणालाही ताब्यात घेतले गेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. संशयिताला पकडण्यासाठी शोध मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे.