मिळालेल्या माहितीनुसार गाझामध्ये इस्रायलचा हाहाकार सुरूच आहे. इस्रायल गाझामध्ये सतत भीषण हल्ले करत आहे. तसेच, रात्रभर गाझामध्ये हवाई हल्ले आणि गोळीबारात ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आवश्यक मानवीय मदत साहित्य मिळवण्याच्या प्रयत्नात मृत्युमुखी पडलेल्या ३८ जणांचा समावेश आहे. गाझाच्या रुग्णालयांनी आणि आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी याबाबत माहिती दिली. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी गाझामध्ये झालेल्या हल्ल्यांवर इस्रायली सैन्याने त्वरित भाष्य केलेले नाही.
हल्ले कुठे झाले?
'गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन'शी संबंधित स्थळांभोवती इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, गाझा पट्टीतील इतर ठिकाणी मदत साहित्य पोहोचवणाऱ्या ट्रकची वाट पाहणाऱ्या ३३ जणांचा मृत्यू झाला आहे.