कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आघाडीसाठी बैठकी झाल्या होत्या. बैठकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील जागांचा तिढा अखेरपर्यंत सुटला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ निघत असताना कॉंग्रेसकडून वेळकाढू पणाचे धोरण सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. पक्षाची ताकत वाढविण्यासाठी आणि सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीने निवडणूक स्वबळावरच लढवावी अशी मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडुन येत होती. त्यामुळे नागपूर महापालिकेच्या रणांगणात आता भाजप, शिवसेना,कॉंग्रेस, आणि राष्ट्रवादी हे चारही पक्ष मैदानात दिसतील.