LPG Price Hike: गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ,आजचे दर जाणून घ्या

रविवार, 1 डिसेंबर 2024 (10:37 IST)
महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. हा गॅस सिलिंडर हॉटेल, रेस्टॉरंट आणि लग्नसमारंभात वापरला जातो. त्याचा थेट परिणाम खाद्यपदार्थांच्या महागाईवर दिसून येईल. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑइलकडून मिळालेल्या माहितीनुसार, 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 16.50 रुपयांनी वाढली आहे. गेल्या महिन्यातही पहिल्या नोव्हेंबरला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती. सरकारी तेल कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे दर ठरवतात.
 
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी सिलिंडरवर ₹ 300 ची सबसिडी दिली जाते. ही सबसिडी एका वर्षात 12 सिलिंडरपर्यंत उपलब्ध आहे. 
 
19 किलोचे व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता दिल्लीत ₹ 1818.50 मध्ये उपलब्ध होईल. गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्येच या सिलिंडरची किंमत 62 रुपयांनी वाढली होती. ऑक्टोबरमध्ये हा सिलिंडर 1740 रुपयांना मिळत होता. सलग पाचव्या महिन्यात तेल कंपन्यांनी या सिलिंडरची किंमत वाढवली आहे. दिल्लीशिवाय कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आता 1927.00 रुपये झाली आहे. हा गॅस सिलिंडर मुंबईत ₹1771.00 आणि चेन्नईमध्ये ₹1980.50 मध्ये उपलब्ध आहे.यावेळीही घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
Edited By - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती