5 डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार,PM मोदीही उपस्थित राहणार

रविवार, 1 डिसेंबर 2024 (10:48 IST)
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तारीख जाहीर झाली आहे. महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमात भाजपचे एकूण 16,416 आमदार, खासदार, विविध सेलचे अध्यक्ष, मंडल अध्यक्ष सहभागी होणार आहेत.
 
महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही घोषणा केली आहे. बावनकुळे यांनी ट्विटरवर लिहिले की, महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता होणार आहे. 
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर विशेष तयारी करण्यात येणार आहे. शपथविधी सोहळ्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 6 ते 7 हजार कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून 4 हजार अधिकारी-कर्मचारी येण्याची शक्यता आहे. 
आझाद मैदानाची क्षमता 50 हजार लोकांची आहे. अंदाजे 25 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं  यावेळी उपस्थित राहणार आहेत.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिलीराज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली व 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाले. 288 सदस्य असलेल्या विधानसभेत 235 जागा महायुतीच्या वाट्याला गेल्या. त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. परंतु, निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीकडून सत्ता स्थापन करण्यात आली नव्हती. परंतू आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स पोस्ट करून दिली .
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती