कोणत्याही खासगी गाडीवर 'पोलीस' लिहीता येणार नाही

सोमवार, 1 जुलै 2019 (16:17 IST)
कोणत्याही खासगी गाडीवर 'पोलीस' असे लिहू शकत नाही किंवा पोलिसांचे चिन्ह लावू शकत नाही असा निर्णयाचा उच्च न्यायालयाने दिला आहे. ठाण्यातील अभ्यासक सत्यजित शहा यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.
 
या का अगदी खाकी गणवेषधारी तसेच वाहतूक पोलिसांना देखील त्यांच्या खासगी दुचाकीच्या मागे-पुढे पोलिसांचं गोलाकार बोधचिन्ह असलेले स्टिकर किंवा पोलीस असे लिहून फिरण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियम कलम १३४(६) आणि कलम मोटर वाहन कायदा कलम १७७ प्रमाणे बोध चिन्ह तसेच फलकाबाबत कारवाई करण्यात येते. जर हा नियम व्यवस्थित वाचला तर याद्वारे असे कळते की कोणत्याही खासगी वाहनावर, कोणताही भारतीय नागरिक कोणत्याही प्रकारचे पोलिसांचे बोधचिन्ह लावू शकत नाही. तसेच 'पोलीस' असे लिहू शकत नाही. त्याचप्रमाणे खासगी वाहनात 'पोलीस' असे लिहिलेला फलक ठेऊ शकत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती